मुंबई । राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील आमदारांच्या पक्षांतराबाबत धक्कादायक दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील प्रत्येकी २५-२५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा थेट आकडा जाहीर करत राऊत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सांगितले की, संबंधित आमदार सध्या ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत असून योग्य वेळ येताच ते भाजपमध्ये विलीन होऊ शकतात. तसेच भविष्यात सुनेत्रा पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचाही दावा त्यांनी केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगावरही टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post