मुंबई । महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीची पीडा लागली आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना नोटीस पाठविली आहे. संदीप राऊत यांना खिचडी घोटाळा प्रकरणी तपासासाठी 30 जानेवारी रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
काय आहे खिचडी घोटाळ प्रकरण?
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक केली. या प्रकरणात ईडीकडून (ED) पहिली अटक आहे. कोविड-१९ महामारी दरम्यान स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटपाशी संबंधित १ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारात चव्हाण यांचा सहभाग असल्याचा संशय होता.
या गुन्ह्यातील रक्कम चव्हाण यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने या तक्रार अर्जाचा तपास करून आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडून यापूर्वी सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावले होते, त्याच बरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत, गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर, सुजित पाटकर यांची देखील या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती
Discussion about this post