मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बँकेत कुठलाही घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लिनचिट दिली होती. मात्र, या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला. कोर्टाने देखील त्यांचा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करण्यास वेळ दिला.आता यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पण महाराष्ट्रात शिखर बँक हा एकच घोटाळा झाला नसून गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळ्यांचा पाऊस पडला आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या घोटाळ्याविरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवून रामलीला मैदानावर उपोषणाला बसावं. आमच्या त्यांना पाठिंबा असेल, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या १० वर्षात देशासह राज्यात अनेक घोटाळे झाल्याचा आरोप केला. या घोटाळ्यांविरोधात अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यांनी दिल्लीत जाऊन रामलीला मैदानावर उपोषण केलं पाहिजे, असा सल्लाही संजय राऊत दिला.















Discussion about this post