मुंबई । एकीकडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठविली असून यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्या व्हिडीओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांच्याकडे असलेल्या बॅगेत नोटांचे बंडल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे. शिरसाट हे बेडरूममध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्या बाजूला एक बॅग पडलेली दिसत आहे आणि या बॅगेत नोटांचे बंडल दिसत आहे. यावेळी ते फोनवर देखील बोलत आहे.
@rautsanjay61 drops a bomb! Shares a video of Shinde Sena leader and Minister #SanjayShirsat. The minister is seen smoking along with bags full of cash in what looks like a hotel room. Yesterday, Shirsat had been served a notice by IT dept. What's going on in Maharashtra? pic.twitter.com/6BD73BZxXl
— Tejas Joshi (@tej_as_f) July 11, 2025
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाली. व्हायरल व्हिडीओनंतर संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट नी म्हटले की, संजय राऊतांनी आजही भुंकण्याचे काम केले आहे. सकाळी उठले की, एकनाथ शिंदे, दुपारी एकनाथ शिंदे, मेळावा असले की, एकनाथ शिंदे. संजय राऊतांनी त्यांच्या मनातील मळमळ आज बाहेर काढलीये. मला वाटते की, त्यांची हातपाय बांधून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की, काय? अशी परिस्थिती निर्माण झालीये. मला वाटते की, अशा मुर्ख माणसासाठी तुम्हीही वेळ घालू नये.
Discussion about this post