मुंबई । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच असून याच दरम्यान, डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनीअमित शहा हे अपयशी गृहमंत्री असल्याचा टोला लगावला. शिवाय नैतिकता शिल्लक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा, असे आव्हानही दिले.
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्याच क्षणी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. मोदींच्या नव्या सरकारमध्ये तीच विटी आणि तोच दांडू आहे. पाच वर्षे गृहमंत्री म्हणून अमित शहा पूर्णपणे अपयशी ठरले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोणतेही ठोस काम केलेले नाही. तेच अमित शहा गृहमंत्री आणि तेच राजनाथ सिंह संरक्षण मंत्री. जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी मोठा नरसंहार केला आहे आणि अमित शहा हात चोळत बसलेले आहेत किंवा फक्त राजकारणामध्ये व्यस्त आहेत. अमित शहा देशातील निवडणुका, खोके जमवणे, धमक्या देणे यात व्यस्त असून देशाचे शत्रू मात्र मोकाट आहेत.
अमित शहा राष्ट्रीय निवडणुका, इतर उद्योग, होर्डिंग, धमक्या इत्यादींमध्ये व्यस्त आहेत. देशाचे दुश्मन मात्र मोकाट आहेत. त्यांनी आमच्या जवानांची हत्या करणाऱ्यांना देशाचे दुश्मन समजले पाहिजे होते. असं ते म्हणले.
Discussion about this post