जळगाव । जळगाव जिल्ह्यातील राजकारणातून एक मोठी बातमी आहे. काही दिवसापासून माजी खासदार उल्हास पाटीलांनी भाजप प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला होता. यानंतर आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला झटका बसलाय. कारण राष्ट्रवादीचे नेते संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते हजारो समर्थकांसह ना. गिरीशभाऊ महाजन यांची साथ धरणार आहेत.
खरं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून या निर्णयावर त्यांचा खल सुरू होता. आधी त्यांनी निकटवर्तीयांच्या सोबत चर्चा केली. नंतर अलीकडेच आपल्या समर्थकांची मोठी बैठक घेऊन त्यांनी मते जाणून घेतली. यात त्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.या अनुषंगाने संजयदादा गरूड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला
ते मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजय गरूड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post