मुंबई । एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊतांनी केला होता. आता यावरून राऊतांच्या या विधानावर शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. एक शिंग तुझ्या नरड्यात खूपसल्याशिवाय राहणार नाही, असे संजय गायकवाड म्हणाले.
“संजय राऊत अंधश्रद्धेचे बळी असे बोलतात, हे पाहत आहे. कामाख्या देवी ही भारतातल्या अनेक भक्ताचं श्रद्धाच स्थान आहे. त्याच्या प्रति परंपरा त्या ठिकाणी पूजा अर्चना करून त्या ठिकाणी केले जाते. आम्ही गुवहाटीला गेलो, त्यावेळेला जागृत देवस्थान आहे असं सांगितलं. म्हणून आम्ही सर्वांनी आणि एकनाथ शिंदे यांनीही त्या ठिकाणी दर्शन घेतलं. भारतामध्ये आपल्या देवस्थान आहे, त्या देवस्थानासमोर नतमस्तक होणे हा अंधश्रद्धेचा भाग नाही”, असे संजय गायकवाड यांनी म्हटले.
नेहमी शिंग आणून पुरले. शिंग आणून पुरले, असं बोलतात. माझं राऊतांना सांगणं आहे की एक शिंग मी नक्की आणणार आणि तो तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत तुझी बडबड बंद होणार नाही”, असा संताप संजय गायकवाड यांनी व्यक्त केला.
Discussion about this post