पारोळा l तालुक्यातील सांगवी येथील तीर्थक्षेत्र श्री दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी साबुदाणा व फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. आरोग्यदूत विकी खोकरे आणि दादाजी भक्त परिवार पाचोरा यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री दादाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, सांगवीचे सरपंच भैया पाटील आणि आरोग्यदूत विकी खोकरे यांच्या हस्ते शेकडो भक्तांना साबुदाणा वडा आणि खिचडी वाटप करण्यात आले.
सांगवी येथील श्री दादाजी धुनीवाले यांचे भव्य-दिव्य मंदिर हे श्रद्धास्थान असून, येथे गुरुमाऊली श्री सेवानंदाजी महाराजांची समाधी आहे. त्यामुळे येथे नेहमीच हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष पूजा-अर्चा झाली आणि भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमात विश्वस्त छोटू बडगुजर, राजू पाटील, फकीरा खो, छोटू पाटील (कबचौउमवि), दीपक वाघ, रमेश चौधरी, भाऊसाहेब पाटील, रमेश वाघ, दीपक पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, वाल्मीक राजपूत, युवराज पाटील, संदीप राजपूत, दादाभाऊ पाटील यांसह अनेक सेवेकरी सहभागी झाले.
भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेत मंदिर व्यवस्थापन आणि आयोजकांचे आभार मानले.















Discussion about this post