मुंबई : समृद्धी महामार्गावर पुन्हा मध्यरात्री मोठा अपघात झाला असून महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही भयानक घटना शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
काय आहे घटना?
सरळआंबा जवळील समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. यावेळी तयार झालेले सिमेंटचे पुलाचे भाग उचलणारे महाकाय मशीन कोसळले. त्याखाली अनेक कामगार दाबले गेले आहेत.
आतापर्यंत १७ पैकी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमीला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात तर दोन जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.
Discussion about this post