मुंबई । ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून त्यांनतर सप्टेंबर महिना सुरु होईल. या महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आहेत. तुम्हाला कोणत्याही आर्थिक कामासाठी बँकेत जायचे असेल, तर तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा तपासून पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १६ दिवस बँकांना सुट्टी असेल. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.
या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करा, अन्यथा तुम्हाला नंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो. पुढील महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाणून घेऊयात..
सप्टेंबर महिन्यात इतके दिवस बँका बंद राहतील
रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे 6 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँका बंद राहतील.
7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँक सुट्टी असेल.
9 सप्टेंबर 2023 च्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
रविवार, 10 सप्टेंबर 2023 रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
रविवार, 17 सप्टेंबर 2023 रोजी देशभरातील बँका बंद राहतील.
बेंगळुरू, तेलंगणा येथे 18 सप्टेंबर 2023 रोजी विनायक चतुर्थीनिमित्त बँका बंद राहतील.
19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील.
कोची आणि भुवनेश्वरमध्ये 20 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी आणि नुआखाईच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
22 सप्टेंबर 2023 रोजी श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.
23 सप्टेंबर 2023 चा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
रविवार, 24 सप्टेंबर 2023 रोजी बँका बंद राहतील.
25 सप्टेंबर 2023 रोजी श्रीमंत शंकरदेवांच्या जयंतीनिमित्त गुवाहाटीतील बँकांना सुट्टी असेल.
27 सप्टेंबर 2023 रोजी मिलाद-ए-शरीफनिमित्त जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.
28 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलादनिमित्त अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इंफाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील.
29 सप्टेंबर 2023 रोजी ईद-ए-मिलाद उन नबीच्या निमित्ताने गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
Discussion about this post