कोल्हापूर । कोल्हापुरातून मोठी बातमी असून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मागच्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याबाबत कुटुंबियांनाही थांगपत्ता नाहीये. संभाजीराजे यांचा कुणाशीही संपर्क नाहीये. संभाजी अज्ञातस्थळी असल्याचं कळतंय.
तीन फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकासकामांचं उद्घाटन होणार होतं. त्यांचा नियोजित दौरा होता. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी दोन फेब्रुवारीला एक ट्विट केलं होतं. काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व!, असं ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संभाजीराजे चाचपणी करत आहेत. ते दौरे करत आहेत. संभाजीराजे या मतदारसंघातून तयारी करत आहेत. अशातच महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा होते आहे. शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे नॉटरिचेबल आहेत.















Discussion about this post