आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत असून आहेत. सत्ताधारी आणि विरोधक लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. असं असताना आता महाविकास आघाडीच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे महाविकास आघाडीत सहभागी झाले तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पण संभाजीराजे छत्रपती यांच्यासाठी एक अट असणार आहे. संभाजीराजे यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करावा लागणार आहे. संभाजीराजेंनी 3 पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेण्याबाबत एकमत झालेलं आहे. पण महाविकास आघाडीने यासाठी संभाजीराजे यांच्यापुढे ठेवलेली अट मोठी आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीच्या ऑफरवर काय भूमिका मांडतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजीराजे यांनी स्वत:चा स्वराज्य म्हणून पक्ष स्थापन केला आहे. त्यांचा स्वत:चा स्वराज्य पक्ष आहे. तसेच ते यापूर्वीदेखील राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी दीड वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण शिवसेनेकडून काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटी संभाजीराजे यांनी मान्य केल्या नव्हत्या.
Discussion about this post