छत्रपती संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगरमधून एक हृदयदायक घटना समोर अली आहे. शहरातील छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लमध्ये महावीर जैन मंदिरच्या बाजूला हे कपड्याचं दुकान होतं. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या दुकानात अचानक आग लागली. या आगीमुळे सात जणांचा मृत्यू झालाय. मृतकांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
दुकानामध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आग लागली, हे अजून समजलेलं नाही. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. हे दुकान छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ आहे. ही एक तीन मजली इमारत आहे.
आसिम वसीम शेख (3 वर्ष मुलगा), परी वसीम शेख (2 वर्ष मुलगी), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम ( महिला 23 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
आगीचं स्वरूप अतिशय भीषण होतं. त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता. सर्व मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. आता त्यांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post