भुसावळ । जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या दोन्ही मुली साकरी येथील रहिवाशी असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत पडल्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला, अपघात की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे
या घटनेबाबात माहिती देताना पोलिस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी म्हणाले, आज सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच आम्ही शोध सुरू केला. यावेळी साखरी गावाजवळ विहीरीत दोन मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह आम्ही पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत, ही घटने नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे, एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे, याप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला की बाकी माहिती तुम्हाला देण्यात येईल असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post