सैनिक कल्याण विभागात भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी ९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक (गट-क) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. सरळसेवेद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्रता काय?
या भरती संधीचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवाराने सशस्त्र दलात किमान १५ वर्षे सेवा बजावलेली असावी. या अनुभवासोबतच उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे मराठी टंकलेखनाचा ३० शब्द प्रति मिनिट वेगाचा शासकीय वाणिज्य दाखला असणे अनिवार्य आहे.वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना २१,००० ते ४१,००० रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना वेबलिंक किंवा प्रसिद्धी पत्रकारवरील क्यूआर कोड स्कॅन करुन अर्ज भरु शकतात. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे ७ दिवस उरले आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.















Discussion about this post