१२वी पास आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्ही sail.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एम अँड एचएस विभागात ही भरती जाहीर केली आहे. या विभागात ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर आणि सीएफपी डिस्पेंसरीमध्ये ड्रेसर कम कपाउंडर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नर्स या पदासाठीही भरती जाहीर केली आहे.सेलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी ६ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे.
सेलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
ड्रेसर कम कपाउंडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने विज्ञान शाखेतून १२वी पास केलेली असावी. नर्स पदासाठी बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे १२वी पास ते पदवीधर उमेदवारांना ही नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती
सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतदेखील भरती सुरु आहे. सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे. ५१ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
Discussion about this post