स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही sportsauthorityofindia.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
स्पोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये हेड कोट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट- लीड पदांसाठी ही भरती जाहीर केली. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
ही पदे भरली जाणार?
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये हेड कोच (बॉक्सिंग), हेड कोच (जुडो), स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग (मल्टी डिसिप्लिन) पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
इतका पगार मिळेल
एसएआयमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १,००,००० ते १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित स्पोर्ट्समध्ये डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत १० वर्षांचा अनुभव असायला हवा.
या नोकरीबाबत अर्जाचा नमुना हा अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. हा नमुना डाउनलोड करुन तो पूर्ण भरावा. त्यानंतर निदेशक, खेळ आणि युवा व्यव्हार संचलनालय, जिमी जॉर्ज इंडोर स्टेडियम, तिरुवनंतपुरम, केरळ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post