बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजेच पदवीधरांना नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेलं उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा
ही भरती प्रक्रिया मध्य प्रदेश स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये राबविली जात आहे. या भरतीमार्फत विविध पदांच्या 197 जागा भरल्या जातील यामध्ये बँक कॅडर ऑफिसर, बँकिंग असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांचा समावेश आहे.
बँकेच्या https://apexbank.in/ या वेबसाइटवर यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे. अधिसूचनेनुसार, विविध ग्रेड अंतर्गत असिस्टंट मॅनेजरसाठी 23, असिस्टंट मॅनेजर प्रोग्रामरसाठी 79 आणि कॅडर ऑफिसरसाठी 95 जागा आहेत.
या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे आहे. महिला, SC/ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत अनुक्रमे पाच वर्षे आणि तीन वर्षांची सूट दिली जाईल.
आवश्यक पात्रता :
असिस्टंट मॅनेजर प्रोग्रामर- कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटीमध्ये प्रथम श्रेणीसह BE/B.Tech केलेले असावे. तुम्ही B.Tech केले नसेल, तर तुम्ही MSc Computer Science/IT किंवा MCA सेकंड डिव्हिजन पाससाठी देखील अर्ज करू शकता. यासह, .NET MVC, .NET Core, HTML, CSS JavaScript, MS-SQL सर्व्हर 2019 आणि त्यावरील प्रोग्रामिंग कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.
असिस्टंट मॅनेजर- कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय विभागातील पीजी पदवी असणे आवश्यक आहे.
बँकिंग सहाय्यक- कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
अर्ज फी
SC/ST आणि दिव्यांग – रु. 918
इतर श्रेणी- रु. 1218















Discussion about this post