मुंबई । सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे न भेटल्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांना कंत्राटदार नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आमदार सदाभाऊ खोत यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना कंत्राट पद्धतीत बदल करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहतो. गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महायुतीचे आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावेत असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
गुलाबराव पाटलांनी पहिले माहिती घेऊन बोलायला हवे होते. तर येथे आठ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व प्रकाराबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते सांगलीच्या तांदूळवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये हर्षल पाटील यांच्या आज रक्षा विसर्जन प्रसंगी सदाभाऊ बोलत होते.
Discussion about this post