धुळे । राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची बातमी सामोर आलीय. भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याने या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर आज सकाळी ११ वााजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं.यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या अपघातामध्ये कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.
Discussion about this post