मुंबई । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रुपाली ठोंबरे पाटील यांना चांगलंच महागात पडलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानं रुपाली पाटलांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्यासोबतच आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांनाही प्रवक्ते पदावरून काढण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुपाली ठोंबरे पाटील या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना दिसल्या.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं होतं.मात्र ठोंबरे पाटील यांचा खुलासा येण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राष्ट्रवादीने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे
त्यांच्या सोबतच आमदार अमोल मिटकरी आणि वैशाली नागवडे यांनाही प्रवक्ते पदावरून काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीने आज नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. यात रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव नाहीये. तर हेमलता पाटील आणि प्रतिभा शिंदे यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच आधीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post