जळगाव । २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभु रामांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक इच्छुक असल्याने बस आगाराने थेट अयोध्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील पाच बस आगारा मार्फत अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
जळगावसह जामनेर, चाळीसगाव, चोपडा , मुक्ताईनगर या पाच आगारातून अयोध्यासह प्रयागराज (काशी) येथे ४२ प्रवाशी थेट जाण्यासाठी उपलब्ध झाल्यास त्यांना अॅडव्हान्स बुकींग नुसार बसेस पुरविण्यात येणार त्यासाठी बस आगाराने भाडे देखील जाहिर करण्यात आले आहे.
जळगाव येथुन चोपडा शिरपुर मार्गाने इंदोर, अयोध्या, वाराणसी-प्रयोराज परत वरई, झाशी, जळगाव अशा प्रवासास प्रती प्रवासी ४ हजार ७१० रूपये आकारले जाणार आहे. जामनेर आगारातून जाणाऱ्या भाविकांसाठी जामनेर, मुक्ताईनगर, खंडवा मार्गाने अयोध्या, प्रयागराज प्रवासासाठी ४ हजार ४६० रूपये तर चाळीसगाव येथुन धुळे, शिरपुर, इंदोर मार्गे प्रवासासाठी ४ हजार ७१० रूपये खर्च येणार आहग. चोपडा येथुन शिरपुर, इंदोर मार्गाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना ४ हजार ५१० रूपये तर मुक्ताईनगर आगारातून जाणाऱ्या भाविकांसाठी ४ हजार ३२० रूपये भाडे असणार आहे.
भाविकांना राहण्याचा व चहा, नास्ता, जेवणाचा व मंदीर पासेसचा सर्व खर्च स्वतः करावा लागणार आहे. अधिक माहीतीसाठी जळगाव आगार व्यवस्थापक संदीप पाटील, कमलेश धनराडे (जामनेर), मयुर पाटील (चाळीसगाव), महेंद्र पाटील (चोपडा) राजेश देशपांडे (मुक्ताईनगर) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post