जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात एक अजब घटना घडली आहे. तिथे धरण फुटल्याची अफवा पसरली आणि या अफवेमुळे लोक थेट सैरावैरा पळत सुटले. मात्र सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण करत अफवेला पूर्णविराम दिला. यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
काय आहे प्रकार?
चोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे परिसरामधील धरणे मोठ्या प्रमाणात भरली. यातच सातगाव डोंगरी परिसरात असलेलं धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गावात थेट धरण फुटल्याची अफवा पसरली होती.
या अफवेला बळी पडून काही ग्रामस्थांनी थेट गाव सोडलं. काही ग्राममस्थ डोंगरावर धावत सुटले होते. मात्र काही सुज्ञ तरुणाने घाबरून न जाता प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केले. आणि ही चित्रफित सर्व ग्रामस्थांना दाखवली. त्यामुळे धरण फुटले नसल्याचे पाहून सर्व ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पण सध्या या अफवेमुळे सर्वच ग्रामस्थांची झोप मात्र उडाली होती.















Discussion about this post