भारतीय रेल्वेत तुम्हीही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सेक्शन कंट्रोलर पदासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
कालपासून म्हणजेच १५ सप्टेंबरपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.रेल्वे बोर्डाने rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्यास सांगितले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करावेत. याचसोबत फी जमा करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२५ आहे.
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २० ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अशा पद्धतीने करा अर्ज
सर्वात आधी तुम्हाला rrbapply.gov.in वर जायचं आहे.
यानंतर अकाउंट क्रिएट करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करा.
यानंतर लॉग इन करुन इतर माहिती भरा.
यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.
अर्जाचे शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.















Discussion about this post