जळगाव । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जुलै २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी १०.०० वाजता गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पी-५१, एम सेक्टर, अतिरिक्त एमआयडीसी, भुसावळ रोड, जळगाव येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित खाजगी आस्थापना व उद्योजक कंपन्यांचा सहभाग राहणार असून विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
खाजगी आस्थापनांनी व उद्योजक कंपन्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home या संकेतस्थळावरील ‘Employer’ विभागात लॉगिन करून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन – ०२ (२०२५-२६)” या टॅबखाली आपल्या रिक्त पदांची नोंद करावी. ज्यांच्या युजर आयडी व पासवर्ड नाहीत अशा नव्याने सहभागी होणाऱ्या आस्थापनांनी या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. नोकर इच्छुक उमेदवारांनी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वरील ठिकाणी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि अडचणींसंदर्भात इच्छुकांनी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५) संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.
Discussion about this post