जळगाव । राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने पक्षाचे लोक पोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडा, असे विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं असून त्यांच्या विधानामुळे सध्या विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनीदेखील गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लबोल केला आहे.सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्या मागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावणार का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना चिमटा
रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री गुलाबराव पाटील सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि आयकर विभागाच्या (आयटी) चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय. मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारावी. असं केल्यास शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील.
Discussion about this post