मुंबई | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार सणसणीत टोला हाणला आहे. माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत. मी शेतकऱ्यांच्या पोरगा आहे, ही माझी लायकी आहे. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.
मी पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काही काम नाही. पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद हे काय उमटले आहेत ते तुम्हाला पण माहित आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
तुम्ही आता पक्षात अजित पवार बनण्याचा प्रयत्न करत आहात, ते कधीही होणार नाही. तुम्हाला माझं आव्हान आहे की, तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे, अस एक पत्र घेऊन यावं. जयंत पाटील त्यांच्या संघर्ष यात्रेत येत नाहीत. त्याचा किती विसंवाद आहे ते दिसून येत आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.















Discussion about this post