जळगाव । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. परंतु निकाल लागून दहा दिवस उलटले तरीही नव्या सरकारचा शपथविधी पार पडला नाहीय. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्याही चर्चा आहे. दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीला चांगलेच चिमटे काढले आहे. त्यांनी कवितेतून महायुतीसह त्यांच्या प्रमुख नेत्यांना चांगलाच टोला हाणला आहे.
रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू,
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू।
आहा… ही ही… हो हो,
आता तुमची गट्टी फू!लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी,
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी।
महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?…— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) December 3, 2024
रूसू बाई रूसू
आज रोहिणी खडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा खरपूस समाचार घेतला. दिल्ली दरबारी जाऊन आल्यापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्यांनी मोदी आणि शाह ठरवतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले असले तरी त्यांची सध्याची भूमिका बरंच काही सांगून जात असतानाच आता खडसे यांनी कवितेतून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. खडसे यांनी एक्सवर याविषयीची एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रुसू बाई रुसू या मथळ्याखाली शिंदे आणि महायुतीला चिमटे काढले आहेत.
रुसू बाई रुसू
रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू। आहा… ही ही… हो हो, आता तुमची गट्टी फू!
लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी, चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी। महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला? सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?
अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी या कवितेतून केली आहे.
Discussion about this post