जळगाव । ‘अब की बार 400 के पार’ असा नारा भाजपकडून देण्यात येत असून यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यातच आता भावजय भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसेंनी नणंदच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
शेवटी तुम्ही विरोधक कितीही बोलत असले तरी शेवटी जनतेचा बोट हे कमळावर पडणार आहे. ते तुम्ही कसं काय थांबणार? नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून हे तुम्ही कसं काय थांबवणार? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
‘मुंगेरीलाल के हासीन सपने’ असाच हा 400 पारचा नारा भाजपचा राहणार आहे. कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. त्यांच्या टीकेला रक्षा खडसेंनी उत्तर दिलं आहे.रावेर लोकसभेची जागा जास्तीत जास्त मताने कशी निवडून येईल. यासाठी नाथाभाऊ जुन्या कार्यकर्त्यांना भेटून प्रयत्न करतायेत. असंही रक्षा खडसे म्हणाल्या.















Discussion about this post