मुंबई/ जळगाव । राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून राज्यात बकरी फिरविण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांची आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आज पक्षाचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे.
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिलं जातं. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानतंर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Discussion about this post