जळगाव । अयोध्येत आज प्रभु रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेत्यांसह कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, अयोध्येत मंदिर अपूर्ण असताना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून हे चुकीचे आहे. या मंदिरासाठी माझ्या वडिलांनी लाठ्या खाल्ल्या आहेत. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून ही गर्दी कमी झाल्यानंतर नक्की दर्शनाला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीखडसे यांनी सांगितले.
भाजपकडून मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास एखाद्या सोहळ्यासारखे स्वरूप दिले गेले असून ते चुकीचे असल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले.पुढे बोलताना म्हणाल्या की, सक्तवसुली संचनालयाकडून विरोधी पक्षातील नेत्यांना बजावल्या जाणाऱ्या नोटीस हा भाजपच्या दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीशी युतीविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. बैठकीत निर्णय होईल. यानंतर चित्र स्पष्ट होईल. सध्या सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस बजावल्या जात आहेत. हे दबावतंत्र आहे. भाजप ज्यांच्या विरोधात बोलतो, त्याला ईडीची नोटीस बजावली जाते. मग ती व्यक्ती भाजपमध्ये गेली की शुद्ध होऊन जाते.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या निकालावरून राष्ट्रवादी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर त्यांनी शरद पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला. नेते सोडून गेले, पण पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथेच आहे. शासन आपल्या दारीसाठी शासनाला गर्दी जमवावी लागते. शरद पवार यांच्या सभेला उत्स्फुर्त गर्दी होते. यातच पवार यांचे यश आहे. सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा, मुस्लिम, धनगर, इतर मागासवर्गीय घटकाला झुलवत ठेवत आहे. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.
Discussion about this post