जळगाव । महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून ‘एक खून माफ करावा’ अशी विनंती केलेली आहे. याच विषयावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबाबत माहिती नाही. मात्र त्या कोणाचा खून करीत आहेत त्याचं नाव त्यांनी सांगावं अशी प्रतिक्रीया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, जळगाव महापालिकेच्यावतीने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण करून दिली. महिलेने तरुणीने तिच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते आणि यावरून त्यांच्यावर खूप टीका सुद्धा झाली होती. मात्र आज स्व संरक्षणाकरता महिला आणि तरुणींनी अशा पद्धतीने वागण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे, असेही ते म्हणाले.
Discussion about this post