रेल्वे मंत्रालयाअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्विसमध्ये (RITES) भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
RITES ने वरिष्ठ तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. तुम्हाला २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
RITES मध्ये एकूण ३० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी जर तुमची निवड झाली तर तुमच्या चांगल्या सरकारी विभागात काम करायची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचा. त्यानंतरच अर्ज करावेत.
RITES मधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासाठी १५ जागा रिक्त आहेत.ईडब्ल्यूएससाठी ५ पदे रिक्त आहेत. इतर जागा राखीव प्रवर्गासाठी आहेत. जे अर्ज करणार आहेत त्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असायला हवी.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. AICTE/BTE)येथून डिग्री प्राप्त करणे गरजेचे आहे. याचसोबत कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २९,७३४ रुपये वेतन दिले जाणार आहे.















Discussion about this post