मुंबई । पालक आणि विद्यार्थी वर्गासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून, राज्य शासनानं राज्यातील इयत्ता तिसरी ते इयत्ता दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर करत त्रिभाषा सूत्र रद्द केलं आहे.
या सुधारित अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी अशा भाषांचा समावेश असून, तिसरी ते दहावीसाठी तो लागू असेल. राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं हा मसुदा तयार करण्यात आला असून, यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण, मूल्यशिक्षण, व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षम परिषदेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे. ज्यामुळं राज्यात हिंदी सक्ती तूर्तास नाहीच? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
इथं राज्य शासनानं हिंदी सक्तीचा शासन निर्णय जारी केल्यानंतर त्यावर कडाडून विरोध झाला आणि शासनानं दोन्ही जीआर रद्द केले. असं असलं तरीही त्रिभाषा सूत्रावर अध्ययन करण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन करण्यात आली असून, पुढील 3 महिन्यांमध्ये या समितीक़डून एक अहवाल सुपूर्द करण्यात येईल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची एकंदर भूमिका पाहता राज्यात पहिलीपासून त्रिभाषासूत्र लागू होणार की पाचवीपासून हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Discussion about this post