मुंबई । पुण्यातील खराडी येथे सुरु असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक केली आहे. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मद्यपान होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून राजकारण तापले आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार निशाणा साधला. ‘भाजपच रेव्ह पार्टी आहे.’, अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली. ‘गिरीश महाजनसारखा सांड मोकाट सुटला आहे. एकदिवस तो देवेंद्र फडणवीस यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.’, असं म्हणत संजय राऊत यांनी महाजनांवर निशाणा साधला.
Discussion about this post