जळगाव /मुंबई : राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल. आज सकाळी १० वा. पासून मतमोजणी सुरू होणार आहे. त्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. पण त्याआधीच राज्यातील ३ ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत. त्या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आल्याचे शिक्कामोर्तब झालेय. १० वाजता निवडणूक अधिकाऱ्याकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तिन्ही ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत. या ठिकाणाच्या नगरपंचायत- नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली आहे. कारण, या नगरपरिषदा बिनविरोध झाल्य आहेत.
त्या ठिकाणाचे नगराध्यक्षही भाजपचेच निवडून येणार आहेत. कारण, जामनेर, दोंडाई आणि अनगर या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराशिवाय एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आज सकाळी १० वाजता स्थानिक निवडणूक अधिकारी याबाबत घोषणा करतील.
तिन्ही ठिकाणी महिला राज –
महाराष्ट्रात सोलापूर, जळगाव अन् धुळ्यातील तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल बिनविरोध लागले आहेत. या तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष निश्चित झाल्या आहेत. त्या तिन्ही नगराध्यक्ष या भाजपच्या आहेत. जामनेरमध्ये साधना महाजन, दोंडाईमध्ये नयनकुंवर रावल आणि अनगरमध्ये प्राजक्ता पाटील (भाजपा) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या तिन्ही ठिकाणी आता महिला राज असेल.















Discussion about this post