बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या दरम्यान मोठा राजकीय गोंधळ झाला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून देशाबाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे. देशव्यापी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना राजधानी ढाका सोडली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर शेख हसीना यांनी राजीनामा देत बांगलादेश सोडला असून त्या भारतामध्ये दाखल झाल्याची माहिती देखील समोर येत आहे
हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतामध्ये आल्या असल्याची माहिती समोर येत आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले आहेत. शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे म्हटले जात होते. पण आता त्या भारतामध्ये आल्याचे सांगितले जात आहे.
Discussion about this post