धुळे । एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे प्रचारात व्यस्त असतानाच शिवसेनेत मोठा भूकंप झालाय. धुळ्यातील तब्बल ५२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत भाजपला पाठिबां दिलाय.
धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप झाला असून पक्षाच्या 52 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्या ५२ जणांनी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना परस्पर उमेदवारी दिल्याने हे सर्व शिवसेना पदाधिकारी नाराज होते.
गोटे यांनी अनेकवेळा शिवसेना पक्षावर जहरी टीका केल्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज झाले. शिवसेना ठाकरे गटाला धुळ्यात हा जबर धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेश न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार असल्याचे यावेळी नाराज पदाधिकारी महेश मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.