जळगाव । गोवंशाच्या जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना हत्यारांसह शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेख अनिस शेख गफूर कुरेशी (४८) आणि मुस्ताक खान हारुन खान कसाई असं अटक केलेल्या दोघांचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडील जनावरांची कत्तल होण्यापासून मुक्तता केली.
याबाबत माहिती अशी, शहरातील हुडको कॉलनी व नागदरोड परिसरात मांसासाठी गोवंश जातीच्या जनावरांचा कत्तलीसाठी वापर होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, रात्री गस्त घालणाऱ्या पथकाला त्यांनी सूचना दिल्या. शुक्रवारी (ता. ८) उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, महेंद्र पाटील, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, भरत गोराळकर हे गस्त घालत असताना सदानंद हॉटेलजवळ दोघे जण दुचाकीवरून एका पिशवीत काही तरी घेऊन जाताना आढळले.
त्यांच्यावर संशय बळावल्यानंतर त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, ते पळून जाऊ लागले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना छाजेड ऑईल मिलजवळ पकडले असता, चौकशीत शेख अनिस शेख गफूर कुरेशी (४८, रा. उर्दु बालवाडीच्या मागे, मोहम्मदिया मशिदसमोर, इस्लामपुरा, चाळीसगाव) व मुस्ताक खान हारुन खान कसाई (४०, रा. अमोल बुट हाउसच्या बाजूला, रथगल्ली, कसाईवाडा, चाळीसगाव) अशी त्यांची नावे त्यांनी सांगितली.
Discussion about this post