रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण बैठकीत रेपो रेट न बदलण्याची घोषणा केली आहे. टॅरिफ तणावादरम्यान जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या वर्षभरात जवळपास तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात झाली आहे. हा रेपो रेट सध्या ५.५० टक्के आहे. तो यापुढेही असाच राहणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रेपो रेटवर बोलताना ते म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने रेपो दर 5.5% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आर्थिक स्थिरता आणि महागाई नियंत्रणासाठी घेण्यात आला. बाजारातील तरलता आणि विकासाला चालना देण्यासाठी धोरण संतुलित ठेवण्यात आले आहे. जागतिक व्यापारातील तणाव आणि महागाई नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे होम आणि कार लोनच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा परिणाम थेट तुमच्या बँकेच्या ईएमआयवर होणार आहे.आता तुमच्या होम लोन आणि कार लोनवरील व्याजात कोणताही बदल होणार नाहीये. तुम्हाला जेवढा ईएमआय याआधी भरावा लागत होता तेवढाच यापुढेही भरावा लागणार आहे. सध्याचा स्थितीचा विचार करुन रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल, असं संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post