जळगाव । महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून यातच जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ॲड. निखिल विजय भोलाणे रा. जळगाव याने महिलेच अशिक्षितपणाचा फायदा घेवून लग्नाचे आमिष दाखवत १५ मार्च २०२३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार महिलेला सहन न झाल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी निखील भोलाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख ह्या करीत आहे.
Discussion about this post