मोठ्या गगनचुंबी इमारतींवरुन स्टंट करणाऱ्या प्रसिद्ध फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडीचा ६८ व्या मजल्यावरुन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध स्टंट मॅनच्या निधनाने चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
३० वर्षीय हा तरुण पेंटहाऊस बाहेर स्टंट करत होता. स्टंट करत असताना आपला पाय घसरत आहे असं त्याला जाणवलं. त्याने स्वत:ला सावरण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याला स्वत:ला सावरता आलं नाही आणि तो धाडकन खाली आदळला.
प्रसिद्ध स्टंट मॅनच्या (Stunt Man) निधनाने चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. @remnigma या इंस्टाअकाउंटवर रेमीने त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेत. साल २०१२ पासून तो अशा पद्धतीचे स्टंट करत होता. फोटोग्राफी हा देखील त्याचा छंद होता. अंगाचा थरकाप उडवणारे त्याचे सर्वच स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Discussion about this post