जळगाव । आधीच अव्वाच्या सव्वा खर्च करूनही शेतकऱ्यांना केळी लागवडीचा खर्चही काढणा कठीण झाला आहे. त्याचे कारण म्हणजेच बोर्डावर भाव असला तरी केळी व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांकडून माल घेत आहे. त्यातच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकलेल्या केळीच्या एकूण वजनापैकी ३ टक्के मालाचे पैसे व्यापारी शेतकऱ्यांना देत नसत आणि शेतकरी ही विना तक्रार ३ टक्के कमी रक्कम स्वीकारत असत. मात्र आता याबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या केळीमालातून ३ टक्के सूट घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील ही सूट देऊ नये; असे आढळून आल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.सभापती सचिन पाटील अध्यक्षस्थानी होते
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात केळी खरेदी विक्रीची ही पद्धत सुरू होती. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकलेल्या केळीच्या एकूण वजनापैकी ३ टक्के मालाचे पैसे व्यापारी शेतकऱ्यांना देत नसत आणि शेतकरी ही विना तक्रार ३ टक्के कमी रक्कम स्वीकारत असत.
पूर्वी केळीची वाहतूक ही संपूर्ण घडाने व्हायची, त्यामुळे ट्रकमध्ये केळी भरताना वापरली जाणारी केळीची पाने आणि केळीच्या दंड्याचे वजन यामुळे ही ३ टक्के सवलत शेतकरी ही मान्य करीत असे. मात्र अलीकडे केळी ट्रकमध्ये भरताना त्याच्या फण्या करून भरल्या जातात आणि केळीच्या पानांचाही फारसा वापर होत नाही. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ही सूट बंद करण्याची मागणी होत होती.यापुढील काळात तालुक्यातील केळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या केळीमालातून ३ टक्के सूट घेऊ नये आणि शेतकऱ्यांनी देखील ही सूट देऊ नये; असे आढळून आल्यास व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ३०) येथे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.सभापती सचिन पाटील अध्यक्षस्थानी होते.
Discussion about this post