मुंबई । राज्यातील आश्रमशाळेत १७९१ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून निविदा तयार केली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची मंजूर पदे भरण्यात येणार आहेत.
राज्यात एका बाजूला शालेय शिक्षण विभागामार्फत टेट परीक्षेतून शिक्षक भरती होत असताना शासकीय आश्रमशाळेत मात्र कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होत आहे. आश्रमशाळेत अनेक पदे मंजूर असताना त्या पदावर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती घेण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती व्हावी, अशी मागणी विविध संघटनेकडून होत आहे.
असे आहेत पदे
उच्च माध्यमिक- २२९
माध्यमिक- ४५५
पदवीधर प्राथमिक – १२०
प्राथमिक इंग्रजी – १७८
प्राथमिक मराठी – ८०९
बाह्य यंत्रणाद्वारेच शिक्षक भरती
शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची भरती करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून अखेर सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभागाने भरतीस मंजुरी दिल्याने हजारो शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
Discussion about this post