मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनने भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. हैदराबाद व विजयवाडा युनिटमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. कराराच्या आधारावर कन्सल्टंट्सच्या (टेक्निकल आणि PA/स्टेनोग्राफर) नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
वयोमर्यादा
अर्ज पाठवताना उमेदवाराचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
पात्रता
टेक्निकल लेव्हल कन्सल्टंट
उमेदवार सीडीए स्केलमधून 7 सीपीसीमधल्या स्तर 8च्या ग्रेडसह निवृत्त झालेले असले पाहिजेत किंवा त्याच लेव्हलची IDA स्केल किंवा समान पोस्टवर काम केलेलं असावं.
पीए, स्टेनोग्राफर लेव्हल कन्सल्टंट
उमेदवार सीडीए स्केलमधून 7’ सीपीसीमधल्या लेव्हल 4/लेव्हल 5/लेव्हल 6 च्या ग्रेडसह निवृत्त झालेले असले पाहिजेत किंवा त्याच लेव्हलची IDA स्केल किंवा समान पोस्टवर काम केलेलं असावं.
पगार
उमेदवारांना OM No.3-25/2020-E.IIA दिनांक 9 डिसेंबर 2020 नुसार मासिक पगार दिला जाईल. ही रक्कम कराराच्या कालावधीत स्थिर राहील. कराराच्या कालावधीत पगारात कोणतीही वार्षिक किंवा टक्केवारी वाढ होणार नाही.
अर्ज फी :
अनरिझर्व्ह्ड/OBC/EWS उमेदवारांसाठी 1000 रुपये फी आहे. अर्जदारांनी फी कल्याणी येथील “Ministry Of Communication KALYANI INTERNAL RESOURCES ACCOUNT” ला डिमांड ड्राफ्टद्वारे पाठवावी.
अर्ज कसा करायचा
पात्र उमेदवारांनी अर्ज भरून तो Asst. Divisional Engineer Telecom (Admin), O/o Special DG Telecom, AP LSA, Department of Telecommunications, 4th Floor, CTO Building, Near Paradise Hotel, Secunderabad— 500003 या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर घ्यावी.
Discussion about this post