महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई या कार्यालयाच्या अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. विधी सल्लागार पदासाठी ही भरती निघाली आहे. ही नियुक्ती एकत्रित दरमहा 40,000 रुपये इतक्या ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांच्या काळासाठी करण्यात येणार आहे.
रिक्त पदांची संख्या – 1
पदाचे नाव – विधी सल्लागार
शैक्षणिक अर्हता आणि अनुभव –
उमेदवार हा वैध मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कायद्याचा पदवीधर असावा आणि सनद धारक असावा.
न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.
शासकीय खरेदीबाबत होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
उच्च न्यायालयात जास्तीत जास्त काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
विधी सल्लागार या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीवेळी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी https://mmgpa.maharashtra.gov.in/mr/ या लिंकवर क्लिक करा. संपूर्ण जाहिरात वाचून मगच आपला अर्ज सादर करावा.
निवड प्रक्रिया –
विधी सल्लागार पदावरील नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त राहील. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई हे नियुक्ती प्राधिकारी राहतील. वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 20 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विहित कागदपत्रांसोबत (साक्षांकित प्रती) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई आरोग्य भवन, 1ला मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई – 1 येथे हस्तपोच सादर करावा.
या पदाची जाहिरात प्राधिकरणाची वेबसाईट https://mmgpa.maharashtra.gov.in/mr/ यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तोंडी मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी प्राधिकरणाच्या सूचना फलकावर आणि वेबसाईटवर https://mmgpa.maharashtra.gov.in/mr/ प्रसिद्ध करण्यात येईल.
Discussion about this post