दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ९७०० होमगार्ड पदांसाठी भरती केली जाणर आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने माहितीपत्रक ही जाहीर केलेले आहे. या भरतीसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
होमगार्डचे कर्तव्य-
तुम्ही या संघटनेचे नोंदणी घेतली तर तुम्हाला या संघटनेमार्फत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याची कर्तव्य दिले जात असतात.
वेतन
माहितीपत्रकानुसार होमगार्ड साठी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बंदोबस्ताच्या काळात जे काम कराल त्यासाठी ५७० रुपये एवढा कर्तव्य भत्ता, १०० रुपये उपहार भत्ता, प्रशिक्षण कालावधीमध्ये ३५ रुपये खिसाभत्ता, १०० रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ९० रुपये कवायत भत्ता दिला जातो.
होमगार्ड पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता :
पुरुषांकरिता पात्रता- वय २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षाचा आत उंची पुरुषाकरिता १६२ सेंटीमीटर छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता ७६ सेंटीमीटर व ५ सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .
महिलांकरिता पात्रता- वय २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षे, उंची १५० सेंटीमीटर
भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
रहिवासी पुरावा- आधार कार्ड, मतदान ओळखपत्र.
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
जन्म दिनांक पुरावा करीत SSC बोर्ड प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला
तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र
तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र
नोंदणी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना
सातारा जिल्हा होम गार्ड अंतर्गत ही नोदणी सुरु आहे.
होमगार्ड नोंदणी चा अर्ज १५ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीमध्ये फक्त इंग्रजी भाषेतून भरायचे असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरायची आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मूदत ही ३१ जुलैला संध्याकाळी ५ पर्यंत असणार आहे.
अर्ज लिंक – https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php
अर्ज सबमिट करुन त्याची छायांकित पत्र काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिकटवावा मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.
३१ जुलैनंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर केली जाईल
अधिक माहितीकरिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/satara%20Enrollment%20Rules%202024.pdf या लिंक वर क्लिक करा.
Discussion about this post