सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १२७ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२४ आहे
भरली जाणारी पदे :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर : ०१ जागा
2) चीफ मॅनेजर : ०४ जागा
3) मॅनेजर : ०४ जागा
4) असिस्टंट मॅनेजर : ५२ जागा
5) ऑफिसर४३ जागा
6) डेप्युटी मॅनेजर : १९ जागा
7) असिस्टंट ऑफिसर : ०३ जागा
आवश्यक पात्रता :
BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर
वयोमर्यादा :
1. ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडमधील जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी ३३ ते ४८ वर्षांपर्यंत असावे.
2. SC आणि STप्रवर्गातील उमेदवारांना ०५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. तर, OBC प्रवर्गातील उमेदवारांना ०३ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज आणि परीक्षा शुल्काविषयी :
ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेडमधील जागांवर अर्ज करणार्या उमेदवारांना परीक्षा आणि अर्जासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
जनरल, ओबीसी, आणि EWS उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
तर, SC, ST, ExSM आणि महिला उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
मिळणार एवढा पगार :
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी : १ लाख रुपये ते २ लाख ६० हजार रुपये
चीफ मॅनेजर पदासाठी : ९० हजार रुपये ते २ लाख ४० हजार रुपये
मॅनेजर पदासाठी ८० हजार रुपये ते २ लाख २० हजार रुपये
असिस्टंट मॅनेजर पदासाठी : ६० हजार रुपये ते १ लाख ८० हजार रुपये
ऑफिसर पदासाठी : ५० हजार रुपये ते १ लाख ६० हजार रुपये
डेप्युटी मॅनेजर पदासाठी : ७० हजार रुपये ते २ लाख रुपये
असिस्टंट ऑफिसर पदासाठी : ५० हजार रुपये ते १ लाख ६० हजार रुपये.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Discussion about this post