नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण झालेले वाहनधारक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसून आले. अशातच जर तुम्ही देखील येत्या काही दिवसांमध्ये इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आधी ही बातमी वाचा.
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक (Electric) वाहनांवरील FAME-2 अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार 2 व्हीलर फेम-2 सबसिडी 33 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकते. असे झाले तर येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहने खरेदी (Buy) करणे अधिक महाग होऊ शकते. FAME ची सबसिडी कमी केल्यास, दुचाकी सेगमेंटमधील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. म्हणजेच येत्या काळात इलेक्ट्रिक वाहने महाग होऊ शकतात. असे झाल्यास त्याचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीवर दिसेल.
FAME-2 योजनेंतर्गत अनुदान 15,000 रुपये प्रति किलोवॅटवरून 10,000 रुपये प्रति किलोवॅटपर्यंत कमी करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. असे झाल्यास त्याचा थेट परिणाम हा इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर होऊ शकतो. सध्याचे 15000 प्रति किलोवॅट किंवा MRP च्या 40% साधारणपणे आहे. हे 10000 प्रति KW किंवा MRP च्या 15% पर्यंत बदलू शकते.
1. इलेक्ट्रिक वाहने होतील का महाग ?
FAME सबसिडी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किमती 35% ते 40% पर्यंत वाढू शकतात. सबसिडी कमी झाल्यामुळे TVS मोटर आणि HERO च्या इलेक्ट्रिक डिव्हिजनवर सगळ्यात मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या सर्वात महाग टू-व्हीलर भारतात (India) आहे.