मुंबई । बँकेचे हप्ते भरणाऱ्या कर्जदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दरात कोणताही बदल न करण्याच्या बाजूने निर्णय घेतला. यांनतर रेपो दर जैसे ठेवण्याचा निर्णय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी घेतला.
यावेळीही रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम असणार आहे. रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळे ग्राहकांच्या वैयक्तिक कर्ज, कार लोन किंवा इतर प्रकारच्या कर्जावर परिणाम होणार नाही. फेब्रुवारीमध्ये रेपो रेट 6.5 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून रेपो दर स्थिर आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे, गृह आणि कार कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात होण्याची वाट पाहणारे लोक निराश झाले आहेत. आता त्यांना कर्जाचा ईएमआय कमी होण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महागाई कमी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँक किरकोळ महागाई 4 टक्क्यांवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. जगात वाढत्या महागाईमुळे महागाई कमी करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, खाद्यतेल आणि तांदळाच्या किमती कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, साखरेचे वाढते भाव चिंतेचा विषय आहे.
शिक्षण आणि रुग्णालयात UPI द्वारे 5 लाख रुपये भरणे
यूपीआय व्यवहारांमध्ये मोठा बदल जाहीर करताना, आरबीआयने सांगितले की, 1 लाख रुपयांऐवजी, तुम्ही शिक्षण संस्था आणि रुग्णालयांमध्ये यूपीआयद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकाल. आरबीआयच्या या निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे.
Discussion about this post